मराठीवरील हल्ले
अ. मराठीवरील प्रथम संकट उर्दूचे : `इ.स. १३१८ मध्ये २०० वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या देवगिरीच्या साम्राज्याचा पाडाव झाला आणि महाराष्ट्र्राच्या वैभवसूर्याला ग्रहण लागले. स्थापन झालेल्या मुसलमानी राज्यात हिंदूंना आणि त्यांच्या धर्माला काहीच स्थान नसल्याने संस्कृत व मराठी यांचा बहुमानही हद्दपार झाला. या भाषांची जागा फारसीने घेतली. मुसलमानांची चाकरी मिळावी; म्हणून सर्वजण फारसीचा अभ्यास करू लागले. स्वभाषेचा अभिमान संपल्यामुळे अस्मितेचेही `फारसीकरण' होऊ लागले. हिंमतराव, जानराव, शरीफजी अशी नावे मुलांना ठेवण्यात येऊ लागली. अर्जदारांचा `फिर्यादी' `काजी'कडे जाऊन त्याचा `फैसला' होऊ लागला. खाना, दरवाजा, सराई, इमारत, झनाना, महाल, दिवाणखाना, हौद, रंगमहाल, जमीन, कसम, फवारा, बुरूज, बेशक, बेलाशक, वाहवा, अफसोस, शाब्बास, ऊर्फ, बेमालूम, बरखास्त, इसम, हद्द, हवा, मुलूख, तयार, शिवाय, हयात इत्यादी शेकडो शब्द ओळखू न येण्याइतपत मराठीत घुसले ! उत्तरेत तर हिंदी भाषेत अरबी व फारसी प्रयोगांची, तसेच नाम आणि विशेषण यांची भर पडून विकृत हिंदी अस्तित्वात आली. तिला `उर्दू' हे नाव मिळाले.
अ १. फारसी भाषा : `महाराष्ट्रावर मुसलमानांचा अंमल होता. त्यांची भाषा फारसी होती. राज्यकर्त्यांच्या या भाषेचा मराठीवर विलक्षण परिणाम झाला. फारसीतून सहस्र शब्द व त्यांचे वाक्प्रचार मराठीत आले. काही संयुक्त क्रियापदेही मराठीत प्रविष्ट झाली. पुढे पुढे फारसीच्या धर्तीवर मराठीचे वळण गेले. शिवपूर्वकालात फारसीने मराठीवर पूर्णपणे ताबा मिळवला होता. राजकीय पत्र फारसी कि मराठी भाषेत आहे, हे ओळखणेही कठीण झाले होते. आमचे संशोधक मित्र सांगतात की, एका राजकीय पत्रातील दीडशे शब्दांतील एकशे चव्वेचाळीस शब्द फारसी आहेत, असे आढळून आले.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment