पालिका कामकाजात १०० टक्के मराठी भाषेचा वापर : यापुढे प्रसिद्धीपत्रके व अहवाल मराठीतूनच !
07-06-2008
मराठी वृत्तपत्रामधील टीकेची आयुक्तांकडून दखल
मुंबई, ७ जून (वार्ता.) - शासन व आयुक्त यांचे आदेश असतांनाही पालिकेच्या कामकाजात अधिकार्यांकडून १०० टक्के मराठी भाषेचा वापर होत नाही, अशी टीका मराठी वृत्तपत्रांनी केली होती. याची दखल घेत आयुक्त डॉ. जयराम फाटक यांनी पालिकेचे कामकाज सर्वसामान्य माणसाला समजण्यासाठी १०० टक्के मराठी भाषेतूनच केले जाईल.
तसेच पालिकेची प्रसिद्धीपत्रके व अहवाल यांच्या प्रतीही मराठी भाषेतूनच देण्यात येतील, असे काल साप्ताहिक पत्रकार परिषदेत जाहीर केले. (महिन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेतही आयुक्त श्री. फाटक यांनी असे जाहीर केले होते. प्रत्यक्ष कारवाई न करता जनतेच्या तोंडाला पाने पुसणार्यांना जनता ओळखून आहे. - संपादक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment