संतांनी मराठी भाषा समृद्ध व वैभवशाली करणे

संतांनी मराठी भाषा समृद्ध व वैभवशाली करणे

अ. मराठी भाषेचे महत्त्व सांगणारी संतवचने१. माझा मर्‍हाटाचि बोल कौतुकें ।परि अमृतातंेहि पैजा जिंके ।।ऐंसी अक्षरंे रसिके । मेळवीन ।। - संत ज्ञानेश्‍वर (अमृतानुभव (ज्ञानेश्‍वरी) ६.१४)(पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणारा आजचा समाज ही अमृताची चव चाखायला कोठेतरी कमी पडतो आहे. - संकलक)

२. माझी मराठी भाषा चोखडी ।परब्रह्मी फळली गाढी । - संत एकनाथ महाराज

३. संस्कृतभाषा देवे केली । मराठी काय चोरापासून झाली ? - संत एकनाथ

---------------------------------------------------------------------------------------------------

आ. शासनाचे कोणतेही प्रोत्साहन नसतांना, उलट विरोध असतांना संतांनी मराठी भाषा समृद्ध व वैभवशाली करणे :

`संतांनी मुसलमानी अमलात मराठीत ग्रंथ लिहिले. त्या मराठीचे स्वरूप अत्यंत सोज्वळ व संस्कृतनिष्ठ आहे. मराठी संतांनी महाराष्ट्रीय समाजासाठी किंबहुना अखिल समाजासाठी नानाविध उपक्रम केले. त्यातून मराठीचे सोज्वळ स्वरूप कायम राहिले. त्या काळी शासनाचे कोणतेही प्रोत्साहन नसतांना, उलट विरोध असतांना या महापुरुषांनी मराठी भाषा ग्रंथरचनेत समृद्ध व वैभवशाली केली. हे आम्ही कधीही विसरता कामा नये. म्हणूनच मराठी माणसांत आपली मातृभाषा व संस्कृती यांसंबधी ज्वलंत अस्मिता कायम राहिली. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

--------------------------------------------------------------------------------------------------

इ. संतांनी लिहिलेली भजने हीच खर्‍या अर्थाने भावगीते असणे

------------------------------------------------------------------------------------------------

ई. साहित्यिकांनो, संतांकडून शिका ! :

`मुस्लीम शासनाच्या वेळी मराठी संतांनी ग्रंथरचना करून मराठीचे स्वरूप सोज्वळ राखले.शासनाचा विरोध असतांनाही मराठी भाषा समृद्ध केली. मराठी माणसात मातृभाषा, संस्कृती व धर्म यांविषयी अस्मिता निर्माण केली.' गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

------------------------------------------------------------------------------------------

उ. साहित्य व अध्यात्म यांच्या संबंधाचे एक उदाहरण : `मी'ला लिंग नाही. स्त्री-पुरुष स्वत:ला `मी' म्हणून संबोधतात. ब्रह्म `ते', म्हणजे नपुसकलिंगी आहे.' - प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे.

No comments: