मराठीद्वेष्ट्या काँग्रेसची निवडणुकीची माहिती देणारी यंत्रणा इंग्रजीतून
मराठी मतदारांना इंग्रजीतून माहिती देणारी यंत्रणा उभारून त्यांची गैरसोय करणारे मराठीद्वेष्टे काँग्रेस शासन !
17-09-2009
-->
मुंबई, १७ सप्टेंबर - निवडणुकीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून `महाराष्ट्र टेलिफोन निगम लिमिटेड'च्या सहाय्याने माहिती पुरवणारी एक मदत यंत्रणा (हेल्पलाईन) कार्यरत करण्यात आली आहे.
मात्र यावरून इंग्रजीतून माहिती देण्यात येत असल्याने मतदार, विशेषत: ग्रामीण भागांतील नागरिक नाराज आहेत. (भारतात इंग्रजी बोलणार्यांचे प्रमाण केवळ अल्प असतांना इंग्रजीतून माहिती देणारी यंत्रणा बसवणारे शासन अजून इंग्रजी भाषेच्या गुलामगिरीतच वावरत आहे ! - संपादक)`१२९० हेल्पलाईन' या मराठीचे वावडे असणार्या निवडणूक मदत यंत्रणेतील सर्व कर्मचारी हे मतदारांनी माहिती विचारल्यावर त्यांना इंग्रजीतून उत्तरे देतात. बहुतांश जण इंग्रजीच्या मार्यामुळे या यंत्रणेवरून माहिती घेण्याचे टाळत आहेत. मराठीत माहिती दिल्यास या मदतयंत्रणेचा उद्देश सफल होईल, असे मतदारांचे म्हणणे आहे.याबाबत मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात या यंत्रणेची जबाबदारी सांभाळणार्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले की, आम्ही कर्मचार्यांना निवडणुकीच्या माहितीचे प्रशिक्षण दिले आहे. भाषेच्या मुद्यापेक्षा मतदारांना योग्य माहिती देणे हा यंत्रणेमागील उद्देश आहे. (मतदारांना उत्तरे मिळण्याचे माध्यमच गैरसोयीचे असेल, तर काय उपयोग ? - संपादक) मराठी उत्तरे देण्याच्या सूचना आम्ही देऊ. (हे पूर्वीच का नाही केले ? - संपादक)
महापालिका कामकाजात उर्दूचा वापर न केल्यास समाजवादी पक्ष रस्त्यावर उतरणार
08-08-2008
मुंबई, ८ ऑगस्ट (वार्ता.) - महापालिका मुख्यालयातील समाजवादी पक्षाच्या कार्यालयावरील लावलेला उर्दू भाषेतील नामफलक हटवण्यावर कारवाई कारण्यात यावी. पालिका कामकाजात मराठी व हिंदी पाठोपाठ उर्दूचा वापर करावा. रस्ते व चौक यांतील नामफलक व बस रेल्वेवर उर्दूचा वापर करण्यात यावा. उर्दूला प्राधान्य न दिल्यास समाजवादी पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा समाजवादी पक्षाचे प्रदेशध्यक्ष अबू अजमी यांनी आज दिला.
(महाराष्ट्राचे इस्लामीकरण करण्यास निघालेले मराठीद्वेष्टे अबू आझमी ! - संपादक) अबू आझमी यांनी पलिका कामकाजात उर्दूचा वापर करण्यात यावा, यासाठी काल पालिका मुख्यालयात पालिकेचे आयुक्त डॉ. जयराज फाटक यांची भेट घेतली.
...तर अबू आझमी यांनी पाकिस्तानात जावे - मनसे
मुंबईत रहाणार्याला मराठी भाषा यायलाच हवी. अबू आझमींना उर्दू भाषेचा पुळका असेल, तर त्यांनी पाकिस्तानात जावे. मुंबईत मराठीलाच प्रधान्य राहील. मराठीतच नामफलक रहातील, असे उत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालिका गटनेते श्री. राजेंद्र राड यांनी अबू आझमी यांनी पत्रकारांमार्फत दिले.
इंग्रजीपेक्षा मराठी सर्वच बाबतीत श्रेष्ठ
इंग्रजीपेक्षा मराठी सर्वच बाबतीत श्रेष्ठ इंग्रजीत अक्षर वेगळे व उच्चार वेगळा असे अनेक शब्द असणे व मराठीत तसे नसणे :
रोजच्या वापरातले असे कितीतरी इंग्रजी शब्द दाखवता येतील, ज्यांचा उच्चार एकमेकांशी साम्य दाखवतो; पण स्पेलिंग मात्र वेगळे करतात. शिवाय अनुच्चारित अक्षरांचा गोंधळ आहेच. `सायकॉलॉजी' (psychology), `न्यूमोनिया' (pneumonia) हे या प्रकारातले ठळक शब्द. येथे सुरुवातीचा `ज्' अनुच्चारित आहे. शब्दाच्या शेवटी आलेला `‘w’' तरी कुठे उच्चारला जातो ? उदा. window, crow,low, flow, know. oesvner शिवाय know मध्ये k आणि w दोन्ही अनुच्चारित आहेत. ते कसे लक्षात रहातात ?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मराठीत उच्चाराप्रमाणे लिहिले जाणे, तर इंग्रजीत कित्येकदा उच्चार वेगळा व अक्षरे (स्पेलिंग) वेगळी असणे ! :
मराठीच्या इकार व उकाराचे नियम तेवढे जड जातात, असे का ? `अँ' व `ऑ' हे उच्चार मराठीने स्वीकारले आहेत. इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत लिहितांना त्यांचा उपयोग होतो. इंग्रजीत लिहितांना त्यांचे स्पेलिंग कसेही असले, तरी मराठीत उच्चारांवरून ते लिहिण्याची चिन्हे सर्वत्र समानच आहेत. इंग्रजी स्पेलिंग वेगळे म्हणून मराठीत चिन्ह वेगळे असे नाही, उदा. फॉल, फॉर, जसा उच्चार तसे चिन्ह किंवा जसे चिन्ह तसा त्याचा उच्चार असतो. s, ed वगैरे प्रत्यय लावतांना किंवा un, en, in वगैरे उपसर्ग वापरतांना गोंधळ होत नाही. त्याचे नियम लक्षात रहातात. सवयीने व्यवस्थित वापरताही येतात. केवळ मराठीचे नियम किचकट, क्लिष्ट वगैरे नसतात. आपली आई पारंपारिक पोशाख वापरते; म्हणून तिच्या नव्या विचारांचा अनादर करायचा आणि झगा घालणार्या तथाकथित आधुनिक राणीच्या परंपराप्रियतेचे मात्र तोंड फाटेपर्यंत कौतुक करायचे, यापेक्षा परधार्जिणेपणा आणखी वेगळा असतो का ?
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एका इंग्रजी शब्दासाठी मराठीत अधिक शब्द; मात्र मराठी शब्दासाठी इंग्रजीत एकच शब्द असणे :
`इंग्रजी भाषेमुळे मराठी समृद्ध झाली आहे. मराठीच्या त्रुटी इंग्रजीमुळे झाकल्या गेल्या आहेत', असे काही आहे का ? तसे मुळीच नाही. मराठी भाषेची शब्दसंपत्ती अमाप आहे. रोज नव्या शब्दांची भर पडते आहे. उलट इंग्रजी भाषेतच रोजच्या व्यवहारासाठी फार मोजके शब्द आहेत, असे (सकृतदर्शनी) दिसते. कितीतरी वेळा एका इंग्रजी शब्दासाठी मराठीत दोनपेक्षा अधिक पर्यायी शब्द उपलब्ध असतात किंवा आपण उलट म्हणू या. मराठीत वेगळे अर्थ प्रकट करणार्या २-३ शब्दांसाठी इंग्रजीत एकच शब्द असतो. अगदी रोजचे सगळयांच्या परिचयातले उदाहरण घ्यायचे झाले, तर मराठीत `उजवा' व `बरोबर' (योग्य) या शब्दांसाठी इंग्रजी `ीग्ुप्ू' हा एकच शब्द आहे किंवा काकू, मामी, मावशी, आत्या या शब्दांसाठी र्`ील्हूब्' हा एकच शब्द आहे. चुलत-आते-मामे-मावस भावंडे सगळी सरसकट `कझन्स'. फार तर `फर्स्ट कझन' हा सख्खेपणा दाखवणारा शब्द वापरतात; पण `चुलत आतेभाऊ किंवा मावस मामेबहीण' ही नाती इंग्रजीत कशी सांगणार ?
घरटी एक किंवा दोन मुले असण्याच्या काळात ही लांबची नाती जास्त जवळ येत आहेत; पण त्यांचे नेमके वर्णन आपल्याला या लाडक्या संपर्क भाषेत करता येत नाही. `लोकांना कशाला कळायला हवीत नेमकी नाती ?' असा प्रश्न काही मंडळी करतीलच; पण तरी या नात्यांसाठी इंग्रजीत नेमका प्रतीशब्द नाही, ही वस्तूस्थिती उरतेच. भूगोलाचा अभ्यास करणार्यांना किंवा खूप प्रवास करणार्यांना हे जास्त जाणवते. आग्नेय, नैऋत्य, वायव्य व ईशान्य या चार उपदिशांना southeast(दक्षिण-पूर्व), south-west (दक्षिण-पश्चिम), north-west(उत्तर-पश्चिम) आणि north-east (उत्तर-पूर्व) अशी नावे आहेत. यात मुख्य दिशांचीच नावे पुन्हा वापरली आहेत. `आग्नेय'मध्ये जो सुटसुटीतपणा व नेमकेपणा आहे, तो `दक्षिण-पूर्व' मध्ये नाही.'
इंग्रजीला मराठीची सर कशी येणार ? : `इयत्ता पहिलीपासून इंग्रजी भाषा अनिवार्य करा', अशी आग्रहाची सूचना `राष्ट्र्रीय ज्ञान आयोगा'ने पंतप्रधानांना भेटून केली. डॉ. मनमोहन सिंग यांचा जागतिकीकरणाचा उत्साह पहाता `ज्ञान आयोगाचा अनुरोध स्वीकारण्यास ते नकार देतील', असे वाटत नाही. `इयत्ता पहिलीपासून आपली मुले व नातवंडे यांच्या मानगुटीवर इंग्रजीचे भूत बसणार', हे गृहित धरून ते आपल्याला हवे कि नको, हे ठरवायला हवे आणि त्याप्रमाणे कृती व्हायला हवी. इंग्रजी आपल्याला हवी कि नको, ते प्रथम ठरवू. आजचा काळ पहाता इंग्रजी आम्हाला हवी आहे. अवश्य हवी आहे; पण एक भाषा म्हणून हवी, मातृभाषा म्हणून नको. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि तिच्याच अंगाखांद्यावर मला माझी मुलेबाळे वाढवायला हवी आहेत. इंग्रजी जागतिक भाषा असेलही; पण तिला मराठीची सर येणार नाही. तेव्हा मला इंग्रजी हवी आहे; पण मराठीला बाजूला सारून ती मला माझ्या घरी यायला नको आहे. इंग्रजीला माझ्या संसारात किती डोकावू द्यायचे, याचा निर्णय मराठी भावविश्वावर पोसलेला माझा पिंड योग्य प्रकारे घेऊ शकेल, याचा मला विश्वास आहे.
संस्कृत (मराठी) मधील `हृदय' व इंग्रजीतील `हार्ट' : `आत्मा हृदयात आहे; म्हणून ते `हृदय' आहे. आमच्या भाषेचे सामर्थ्य पहा कसे आहे. `हृदय' हा शब्द संस्कृत आणि मराठीतही आहे. हृदयाची आठवण होताच परमात्मा वा आत्मा यांची स्मृती होते; कारण तोच आत्मा वा परमात्मा हृदयात आहे. (स वा एष आत्मा हृदि ।) त्याचे `हृदि अयं' हे निरुक्त आहे.
तस्य एतदेव निरुक्तं ।हृदयम् इति, तस्माद् हृदयम् ।
अर्थ : ... म्हणून ते `हृदय' आहे. असे जाणणारा देवाशी साम्यत्व प्राप्त करतो.मराठीद्रोही अप्पा म्हणतात, ``हृदय' हा शब्द संस्कृत आहे. तो मराठीत कशाला घुसडला ? हृदयाचे स्मरण झाले की, देव-धर्म आठवतो. देव-धर्म सगळे आम्हाला फेकून द्यायचे आहे. `हृदय' ऐवजी `हार्ट' हा सुंदर इंग्रजी शब्द वापरा. `हार्ट'ला पहा व्यापारी गंध आहे. देव-धर्म झुगारून पुष्कळ `धन' कमवा, त्याकरता `हृदयशून्य'व्हा !'' `हार्ट'चा वापर आम्हाला कशाही सूक्तासूक्त मार्गांनी `धन' प्राप्तीचा संदेश देतो, हे ध्यानी घ्या.' अशा अप्पांसारख्या मराठीद्रोह्यांना तात्काल हटकले पाहिजे.- गुरुदेव डॉ. काटेस्वामी
मातृभूमी, मातृदेवी (सरस्वती) व मातृभाषा यांचे महत्त्व
मातृभूमी, मातृदेवी (सरस्वती) व मातृभाषा यांचे महत्त्व
`या तिन्ही देवता सुख देणार्या आहेत. त्यांची महती फार असल्यामुळे त्यांनी समृद्धतेने आमच्या ठिकाणी वास्तव्य करावे. भूमी, सभ्यता व वाणी यांच्याद्वारे मानवाची संस्कृती आणि मानवता दिसून येते. `त्यांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्य करत रहावे', असे सांगितले आहे; म्हणूनच क्षात्रधर्माचे यशोगान केले आहे.
अ. मातृभूमी : ही आपले भरण-पोषण करून आपल्याला समृद्ध करते. आपली मातृभूमी नेहमी स्वतंत्र पाहिजे. त्यामुळेच मानव आपला विकास साधू शकतो. आपली मातृभूमी मिळवून आज इस्त्रायल राष्ट्र थोड्याच काळात आपल्या बुद्धीकौशल्याने व प्रयत्नाने प्रगत झाले आहे.
आ. मातृदेवी (सरस्वती) : वरील समजून घेण्यासाठी व तिकडे लक्ष लागण्यासाठी सरस्वतीदेवीची कृपा पाहिजे; म्हणून तिची आराधना केली पाहिजे. ती आपल्याला या जगताचे गूढत्व सहज रीतीने सांगते व आपली बुद्धी निर्मल करून मेधाशक्ती जागृत करते.' - प.पू. परशराम माधव पांडे महाराज (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ३७-३८)
इ. मातृभाषा : मातृभाषेद्वारे मिळालेल्या ज्ञानाद्वारे माणसाला जग, समाज व राष्ट्र्र यांचे ज्ञान मिळते. ऋषीमुनींनी दिलेल्या अमृतमय ज्ञानाला घेऊन `मी कोण, कशा रीतीने दीर्घायुष्य घालवले पाहिजे व त्याचा उपयोग कसा समर्थतेने करून घ्यावयास पाहिजे', हे समजून घ्यावे. यामुळे तो स्वत: समृद्ध होऊन समाज व राष्ट्र्र यांना समर्थ होण्यास हातभार लावू शकतो आणि आपले जीवन आनंदात घालवू शकतो. माणसाला आईकडून मातृभाषा सहज मिळालेली असते. तो आपले विचार व मनन मातृभाषेत चांगल्या रीतीने करून आपली प्रगती करू शकतो. भाषा एकात्मभाव व जवळीकता साधण्यास मदत करते.
प्रत्यक्ष कृती
महाराष्ट्रातील दुकाने, संस्था व आस्थापने यांच्या नावांचे फलक मराठी भाषेत असावेत, अशी सरकारची अधिसूचना असतांना राज्यात त्याचे पालन होत नाही. मातृभाषेचा विकास होण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, त्यांपैकी राज्यातील संस्थांचे नामफलक राज्याच्या राजभाषेत असणे महत्त्वाचे आहे. शिवसेनेने मराठी भाषेच्या वापराबद्दलची त्यांची भूमिका ठाम ठेवली आहे आणि त्याचा प्रत्यय दोन दिवसांपूर्वीच शिवसैनिकांनी केलेल्या प्रत्यक्ष कृतीतून आला. माहीम येथील `बाँबे स्कॉटिश' शाळा, बोरीबंदर येथील `बाँबे हायकोर्ट' व प्रभादेवी येथील `बाँबे डाइंर्ग' या तीन आस्थापनांच्या नावांतील `बाँबे' या शब्दाला त्यांनी आक्षेप घेतला. `बाँबे स्कॉटिश'च्या चारही दरवाजांपाशी जाऊन नामफलकातील बाँबे या शब्दाला काळे फासले. `बाँबे डाइंर्ग'च्या बाबतीत शिवसैनिकांनी तशीच कृती केली व `बाँबे हायकोर्ट'च्या बाबतीत पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे शिवसैनिकांचा कार्यक्रम बारगळला. कलकत्त्याचे कोलकाता चालते, मद्रासचे चेन्नई चालते, मग बाँबेचे मुंबई का नको, हा शिवसैनिकांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सरकारकडे याचे काय उत्तर आहे ? कि मराठी भाषेची अवहेलना आणि द्वेष हाच त्यांचा कार्यक्रम आहे ?
अधोगतीचे मूळ
मराठी भाषेबाबत स्वत:च दिलेल्या आदेशाची पायमल्ली करणारे मराठीद्रोही काँग्रेस सरकार !
13-05-2008
विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, हा सूज्ञ पालकवर्गाचा नेहमीचा आग्रह असतो. भारतीय शिक्षण क्षेत्रात पाश्चात्त्य शिक्षण पद्धतीने केलेला प्रवेश आपल्या संस्कृतीचा अभिमान असणार्यांना धोकादायक वाटतो व त्यामुळे त्यांचा शिक्षण क्षेत्रातील सुधारणांविषयी आग्रह असतो.
त्यांना अभिपे्रत असलेल्या सुधारणा या भारतीय संस्कृतीशी निगडित असतात आणि शिक्षणाची व्यवस्था करून देणार्यांना म्हणजे सरकारला `धर्मनिरपेक्षता' हा गुणधर्म जोपासण्याच्या नादापायी भारतीय संस्कृतीशी संबंधित बाबींचा उल्लेखच नको असतो. आजच्या शिक्षणाचा पाया ज्या थोर व्यक्तींनी घातला, त्यांना शिक्षण क्षेत्रातील आजची अवनती पाहून काय वाटले असते, ते सांगायला शब्द नाहीत. साधारण शंभर वर्षांपूर्वीचा काळ आपण जेव्हा इतिहासाची पाने परतत पहातो, तेव्हा शिक्षणाची काय अवस्था होती, ते सहज लक्षात येते. इंग्रजांना त्यांच्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था भारतियांवर लादायची होती आणि प्रचलित भारतीय शिक्षण पद्धती त्यांना पुरती मोडीत काढायची होती. भारतीय संस्कृतीचे शिक्षण दडपून टाकायची इंग्रजांची मानसिकता ज्या लोकांना मानवणारी नव्हती, त्यांनी स्वत:चे प्रयत्न सुरू करून स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निर्भीड नेतृत्व तेव्हा लाभल्यावर राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या प्रयत्नांना जोम आला. शिक्षण द्यायचे म्हणजे शिक्षण संस्था पाहिजेत आणि शिक्षण संस्था पाहिजेत तर पैसा पाहिजे, हे समीकरण त्या वेळी उभे राहिले. शिक्षणाची व्यवस्था करणे हे ध्येय होते, तर त्यासाठी लागणारा पैसा ही समस्या होती. इंग्रज अधिकार्यांना राष्ट्रीय भाषांतील शिक्षण देणार्या संस्था नको होत्या. त्यांनी त्यांच्या धोरणाप्रमाणे काही संस्था बंदही पाडल्या. यवतमाळ येथील अशीच एक संस्था बंद पाडल्यावर तेथे विशिष्ट ध्येयाने सेवा करणारे वि.गं. तथा दादासाहेब केतकर पुणे येथील संस्थेत दाखल झाले. त्यांना विद्याप्रेमी विद्यार्थी मिळाले; पण संस्था चालवण्यासाठी पैसा कमी पडू लागला. हा प्रसंग दादासाहेब केतकर यांच्यासाठी कसोटीची वेळ होती. त्यातून ते कसे यशस्वी झाले, ते पहाणे म्हणजे शिक्षण महर्षीच्या जीवनाचे दर्शन घेतल्यासारखे होईल. सध्या राजकारणातील शिक्षण सम्राट पहाण्याची आपल्याला सवय झालेली आहे. प्रथम हातात पैसा व नंतर शिक्षण संस्था, हे आजचे समीकरण आहे. शंभर वर्षांपूर्वी `अगोदर शिक्षण संस्था उभारण्याची तळमळ व नंतर त्यासाठी हव्या असलेल्या निधीची उभारणी', असे चित्र होते. दादासाहेब केतकर यांनी राष्ट्रीय शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी माधुकरीची झोळी हातात धरली. जोडीला कोरडी भिक्षा मागायला सुरुवात केली. ध्येयपूर्तीसाठी त्यांनी अक्षरश: डोंगराएवढे कष्ट उपसले. ते त्यांच्या ध्येयाला घट्ट चिकटून राहिले. माधुकरी, कोरडी भिक्षा, वर्गण्या, देणग्या आदीे नीधीसंकलनाचे सर्व प्रयत्न सुरू ठेवले. त्यांच्या या जिद्दीच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले, संस्था बहरत गेली. आजची `पुणे विद्यार्थीगृह' हीच ती संस्था! आजपासून ती शताब्दी वर्ष साजरे करत आहे. आजचे शिक्षण सम्राट व पूर्वीचे तळमळीचे शिक्षणयोगी यांच्या कार्याची माहिती करून घेतल्यावर आजच्या सामाजिक व शैक्षणिक अधोगतीचे मूळ दिसायला लागते.
गोव्यातील मराठीसाठी शिवसेनेचा एकाकी लढा
गोव्यातील मराठीसाठी शिवसेनेचा एकाकी लढा !
मराठीप्रेमींनो, मराठीच्या रक्षणासाठी लढणार्या शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भाषाभिमान जागवा !
28-05-2008
गोव्यातील मराठी, हा मराठीप्रेमींसाठी चिंतेचा विषय आहे.गोवा हा मराठी अस्मिता व संस्कृती यांच्याशी पूर्णत: एकरूप झालेला प्रांत आहे; पण येथून मराठीलाच हाकलण्याचे कारस्थान शिजत आहे. गोमंतकात मराठीप्रेमी संघटना खूप आहेत; मात्र कामाचे कोणीच नाहीत, अशी स्थिती आहे. याला अपवाद शिवसेनेचा म्हणावा लागेल.
गोव्यातील सरकारी कार्यालयांचे फलक मराठीतून असावेत, यासाठी शिवसेनेने मागील महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे. काल या आंदोलनाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर ९ शिवसैनिकांना अटक झाली. शासनाच्या आदेशानंतरही शासकीय खात्यांचे फलक मराठीतून न लावणार्या उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसैनिकांनी धडक दिल्याचे निमित्त झाले व कारवाईसाठी कधी नव्हे, इतकी तत्परता काँग्रेस सरकारने दाखवली. वास्तविक शासकीय खात्यांचे फलक मराठीतून लावण्याचा आदेश शासनाचाच; पण शासनाचीच खाती तो आदेश पाळत नाही, इतका भोंगळपणा गोव्यात चालतो, याची लाज येथील काँग्रेसच्या सत्ताधिशांना वाटायला हवी. `शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करा', असे सांगणार्या शिवसैनिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून ही लाज थोडीतरी वाचवणे सरकारला शक्य होते; पण विरोधक कितीही योग्य असले, तरी त्यांना बदडायचेच, ही नीती काँग्रेस इंग्रजांकडून शिकली त्याला कोण काय करणार ?
मराठीवाद्यांची १५ वर्षांची निष्क्रीयता !
गोव्यातील सरकारी कार्यालयांचे फलक इंग्रजी, कोकणी व मराठीतूनही असावेत, यासाठी ऑक्टोबर १९९३ मध्ये पहिले परिपत्रक काढण्यात आले. असेच पत्रक एप्रिल २००८ रोजी गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयानेही काढले. म्हणजे १९९३ साली काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी पंधरा वर्षांत सरकारी खात्यांनी केली नव्हती. या काळात काँग्रेस, भाजप यांची सरकारे आली व गेली. या सरकारांत बहुतांश सर्वच घटकपक्ष होते; पण यांपैकी एकाही पक्षाने शासकीय कार्यालयांतील फलक मराठीतून लावावेत, यासाठी आग्रह धरला नाही. काँग्रेस व भाजप यांची सरकारे तर मराठी बाणा सांगणार्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या टेकूवरच सत्तेत होती व आजही आहेत. या संधीचा राजकीय लाभ अनेकवेळा घेतलेला दिसेल; पण गोमंतकात मराठी टिकवण्यासाठी ही ताकद कधी पुढे आली का ? याउलट गोमंतकात एकही आमदार नसलेली शिवसेना मराठीसाठी लढते आहे, म्हणूनच आम्हाला तिचे अधिक कौतुक वाटते. कोणी म्हणेल, `शिवसेनेची कृती हे राजकारण आहे.' भले असेल राजकारण; पण ते मातृभाषेसाठी आहे. इतर पक्षांप्रमाणे स्वार्थासाठी नाही, हे शिवसेनेचे मोठेपण नव्हे का ?
अस्तित्वहीन मराठीवाद्यांना जाग येईल का ?
गोव्यात मराठीला दुर्लक्षून मारण्याचे कारस्थान सध्या सरकारी पातळीवर रचले जात आहे. सामाजिक दृष्टीकोनातून पाहिल्यासही गोव्यातून मराठी हद्दपार होईल, अशी भीती वाटते. मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची दरवर्षी घसरती पटसंख्या व सर्वच क्षेत्रांत इंग्रजीचे वाढते स्तोम, हे सर्व चिंतेचे विषय आहेत. तरीही ही परिस्थिती सुधारण्यासाठी मराठीवादी काही हालचाल करतांना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी दहावी इयत्तेच्या मराठी भाषेतील इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात मराठीचा अक्षरश: खून करण्यात आला; पण मराठीच्या अस्तित्वाविषयी गळा काढणार्या मंडळींनी या पाठ्यपुस्तकाबाबत काही केले नाही. आता शासकीय कार्यालयांच्या फलकाच्या विषयातही शिवसेना एकटीच लढत आहे. काही महिन्यांपूर्वी गोमंतक मराठी अकादमीचा इंग्रजी भाषेतील फलक तोडून तिथे मराठी फलक लावण्याच्या आंदोलनात स्वातंत्र्यसैनिक व अकादमीचे सदस्य श्री. श्यामसुंदर नागवेकर हेच वृद्ध एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढले. मराठी बचाव आंदोलन, गोमंतक मराठी अकादमी, अशा नावांवर स्वत:चे अस्तित्व टिकवून बसलेली मंडळी मराठीच्या रक्षणासाठी नेमके काय करत आहेत कि केवळ संघटनेतील जागा अडवून बसण्यात ते स्वत:ला कृतार्थ समजतात, याचा उलगडा जनतेला व्हायलाच हवा. अर्थात संघटनेची दुकाने थाटलेली ही मंडळी काहीच करत नाहीत, म्हणून शिवसेनेने स्वस्थ बसू नये. त्यांनी मराठी भाषा वाढवण्याच्या मोहिमेत नेहमीच पुढे रहावे. दिवसेंदिवस अधिक आग्रही व आक्रमकही व्हावे. तरच भाषिक अस्मितेशी काहीही देणेघेणे नसलेला कुंभकर्णासारखा झोपलेला आजचा समाज माय मराठीच्या ध्यासाने कधीतरी जागा होईल.